Categories: सांगली

मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (‘ड्रायपोर्ट’) सलगर येथे – खा संजय पाटील यांची माहिती

सुधीर गोखले

सांगली : सांगली जिल्ह्यातील बहू चर्चित बहुप्रतीक्षित आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले बहू चर्चित ‘ड्रायपोर्ट’ आता मिरज तालुक्यातील सलगर येथे होणार असल्याचे आणि त्यासाठी सलगर येथील तब्बल ३५० एकर शासकीय जमीन हस्तांतरण होणार असल्याची माहिती खा संजय पाटील यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई येथे उद्योग मंत्री ना उदय सामंत यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC बिपीन शर्मा,डेप्युटी CEO MIDC शिवाजी पाटील, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, कोल्हापूर एमआयडीसी RO, सांगली MIDC च्या श्रीमती बिरजे व इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत आपण मॅरेथॉन बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन गुड न्यूज आपण देत आहोत नुकताच कवलापूर येथे विमानतळाचा प्रश्न देखील मार्गी लागला असून आज या ड्रायपोर्ट च्या निर्णयाने आपण शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून चे पाहिलेले स्वप्न साकारत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ड्रायपोर्ट उद्योग खात्याकडे जागा हस्तांतरणासाठी राज्याचे उद्योग मंत्री ना उदय सामंत, मंत्रालयीन सचिव व वरिष्ठ अधिकारी तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक संपन्न झाली . जिल्ह्यातील पूर्व भागात असलेले सलगरे येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क हा एक माझा ड्रीम प्रोजेक्ट असेल . त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे एक सुवर्णपानच ठरणार आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘प्रस्तावित पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे ला लागून 350 एकर एवढी सरकारी जमीन असून सलगरे येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क (MMLP) ड्रायपोर्ट झाल्यास शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते तसेच वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्यामुळे चांगल्या दर्जाचा माल वेळेत बाजारपेठेत जाऊ शकतो सलगरे ता. मिरज येथील हा ड्रायपोर्ट प्रस्तावित ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे आणि लागून मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गापासून जवळ आहे. याचाही या ड्रायपोर्ट ला उपयोग होईल.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago