दौंड : दापोडी येथील महावितरण कंपनीच्या यार्डमध्ये आग लागून लाखो रुपयांची केबल जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत येथील कंट्रोल रूम ला संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सध्या संपावर गेले असल्याने येथील देखभाल सध्या महावितरण चे मुख्य व्यवस्थापक येडके हे पाहत आहेत. आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महावितरण च्या दापोडी येथील यार्डमध्ये अचानक आग लागली. हि आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असावी असा प्राथमिक अंदाज कर्मचाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. दुपारी आग लागल्यानंतर त्याठिकाणी मुख्य व्यवस्थापक येडके यांनी येऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली मात्र त्यामध्ये केबल चे चार ते पाच ड्रम जळून मोठे नुकसान झाले आहे.
Home Previos News दापोडी येथील महावितरणच्या यार्डमध्ये आग, कर्मचारी संपावर असतानाच आग लागल्याने लाखो...