|सहकारनामा|
दौंड : दौंड शहरात सध्या विजेचे अघोषित भारनियमन होत आहे, हा प्रकार बंद करून महावितरण कंपनीने दौंड करांना पूर्णवेळ वीज पुरवठा पुरवावा अशी मागणी दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे, तसेच विज बिल थकबाकी दारांचे वीज जोड न तोडता त्यांना बिलासाठी हप्ते बांधून द्यावेत अन्यथा महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे. पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीला देण्यात आले.
कामाच्या नावाखाली दररोज शहरातील विविध भागात भारनियमन केले जात आहे. शहरातील कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता कोठेतरी शहरातील बाजारपेठा, घरगुती पीठ गिरण्या व इतर व्यवसाय सुरू झाले आहेत, त्यामुळे भारनियमन न करता त्यांना पूर्णवेळ वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच लॉक डाऊन मुळे व्यापारी, खाजगी नोकरदार यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे वीज बिलांची वसुली करताना कोणाचेही विज जोड न तोडता बिलाचे पैसे भरण्यासाठी त्यांना हप्ते बांधून द्यावेत. महावितरण कार्यालयामध्ये एक सक्षम तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी पक्षाचे पदाधिकारी हरेश ओझा, महेश जगदाळे,तन्मय पवार, विठ्ठल शिपलकर, अतुल जगदाळे, रज्जाक शेख, अतिश जगताप, सुनील मधुरकर उपस्थित होते.