Categories: Previos News

MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दौंड तालुक्यातील दुसरी घटना

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील मल्हारी नामदेव बारवकर (वय२५) या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत महादेव पांडुरंग बारवकर यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली असून पाटस (यवत) पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
मल्हारी बारवकर हा विद्यार्थी MPSC ची परीक्षा देत असल्याचे माहितीतून समोर येत असून त्याने MPSC चे काही पेपरही दिल्याचे समजत आहे. मल्हारी ने नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी अशी माहिती मिळत आहे.
MPSC ची तयारी करणाऱ्या मल्हारीची आत्महत्या ही दौंड तालुक्यातील दुसरी आत्महत्या असून मूळ केडगाव येथील रहिवासी असणाऱ्या स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी अशीच आत्महत्या केली होती.
आत्महत्येची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांसह पाटस पोलीस स्टेशनचे पो.ह.भानुदास बंडगर, पो.ना घनश्याम चव्हाण, पोलीस कर्मचारी समीर भालेराव, गणेश मुटेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रकाराची माहिती घेऊन चौकशी सूरु केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago