|सहकारनामा|
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने दौंड तालुक्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मन विषन्न करणारी घटना नुकतीच घडली आहे. त्याच्या रूपाने एका हुशार, होतकरू तरुणाला आपण मुकलो असल्याही भावना आ.राहुल कुल यांनी व्यक्त करत राज्य शासनाने विविध विभागांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.
आ.राहुल कुल यांनी स्व. स्वप्नील लोणकर यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना अतिशय कष्टाने, जिद्दीने, अनंत अडचणींना तोंड देत वर्षानुवर्षे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करून अखेर यश मिळवून देखील पदरी निराशा पडणाऱ्या स्वप्नील लोणकर सारख्या हजारो तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि त्याची परिणीती हि आत्महत्येत होते हि अत्यंत खेदाची बाब असल्याचे सांगत हे, राज्य शासनाने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन विविध विभागांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.
स्वप्नील लोणकर हा युवक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्याचे जॉइनिंग रखडल्याने तो नैराश्येत सपाडला होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
स्वप्नील लोणकर हा मूळ केडगाव ता.दौंड येथील युवक असल्याने त्याच्या आत्महत्येनंतर दौंडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दिवसरात्र मेहनत करून, परीक्षा पास होऊनही पदरी निराशा पडत असल्याने त्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे आणि याला सरकार जबाबदार असल्याचे त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार मानत असल्याने आता सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.