अख्तर काझी
दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून लाडली गोशाळा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, रामभाऊ टूले, लाडली गोशाळेचे राम दावरा, सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी, सुनील मुलचंदानी आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी गोशाळेचे नियोजन व कामकाज पाहून गो शाळेचे सर्व गोपालक ,सभासद, देणगीदार यांचे मन:पूर्वक कौतुक केले
. व गोशाळेला लागणाऱ्या नागरी सुविधा ( रुंद रस्ता व पथदिवे ) पुरवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.
लाडली गोशाळा येथील रम्य व सेवाभावी वातावरण पाहून त्यांना आपलेपणाचा आविष्कार झाल्याचे त्या म्हणाल्या. लोकप्रतिनिधींनी गो शाळेला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने देणगीदार व गोपालक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक