खासदार संजय राऊत यांचे भीमा पाटस कारखान्याच्या अध्यक्ष, संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी अचानक दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाण्याचे प्रकरण उचलून धरल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तर या कारखान्याचे अध्यक्ष आ.राहुल कूल हे सध्या हक्क भंग समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया त्यांचे कार्यकर्ते देत आहेत.

खासदार संजय राऊत यांनी एक लेटर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असून यामध्ये त्यांनी भीमा पाटस कारखान्याच्या संचालक मंडळाबाबत 500 कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसेच या पत्रामध्ये त्यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जशी इडी ची चौकशी सुरु आहे तशी चौकशी या कारखान्याची करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत यांचे भीमा पाटस कारखान्याच्या अध्यक्ष, संचालक मंडळावर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी आपल्या पत्रामध्ये…

प्रिय देवेंद्र जी
आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे..
Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे  घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत.
शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का? कारवाई करा! असे ट्वीट केले आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, संचालकांनी एकाच वाहनावर विविध बँकेची कर्जे कशी घेतली असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत आमदार राहुल कूल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.