Categories: Previos News

केंद्रसरकारच्या इंधन दरवाढी विरोधात दौंड युवासेनेचे सायकल आंदोलन

दौंड : केंद्रातील भाजप सरकार कडून रोज पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ केली जाते. परिणामी पेट्रोल व डिझेलच्या भावाने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी युवासेनेच्या वतीने चौफुला (ता. दौंड) येथे युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वाखाली पुणे सोलापूर रोडवर सायकल चालवून आंदोलन करण्यात करण्या येऊन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे यांनी केंद्रातील भाजप सरकार वर कडाडून टीका केली. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी मोदी सरकारने सत्तेवर येताना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला की काय असा घणाघाती आरोप केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, युवा सेना तालुका युवा अधिकारी समीर भोईटे, शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने युवासेना, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago