केडगाव मध्ये घुमू लागले काकडा आरतीचे सूर

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव, वाखारी व इतर सर्व भागांमध्ये काकडा आरतीचे सूर घुमू लागले आहेत. अश्विन महिन्यातील पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू राहते, दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी ही पद्धत प्रचलित आहे.

आरती नंतर विविध भजने स्तोत्रे म्हटले जातात, यामध्ये वयस्कर लोक प्रामुख्याने सहभागी असतात. सध्याच्या तरुण पिढीने देखील यामध्ये सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे ज्यामुळे परंपरा जोपासली जाईल अशी भावना प्रा. ओंकार अवचट यांनी व्यक्त केली.

सध्या केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, वाखारी, या ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये काकड आरतीसाठी नागरिक सकाळीच गर्दी करताना दिसत आहेत. थंडीचा मोसम सुरु झाला की काकड आरतीला सुरुवात होते. हिंदू महिन्यांप्रमाणे अश्विन महिन्यातील पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू राहते.