Categories: Previos News

Mobile Tower issue – केडगाव ग्रामपंचायतीच्या नोटीसला केराची टोपली..? ग्रामपंचायतचा आदेश डावलून मोबाईल टॉवर सुरू?



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे एका मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले त्यावेळी केडगाव ग्रामपंचायतीने जवळ असलेली मुलांची जिप शाळा, सरकारी दवाखाना आणि भर लोकवस्ती आणि लोकांचा विरोध पाहून या मोबाईल टॉवरचे काम थांबविण्याचे आदेश  संबंधित मोबाईल कंपनीला दिले होते आणि तशी नोटीस ग्रामपंचायतीने संबंधित मोबाईल टॉवरच्या ठिकाणी लावलेली आहे. मात्र तरीही या मोबाईल कंपनीने या नोटिशिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत मोबाईल टॉवरचे काम सुरूच ठेऊन ते काम पूर्ण केलेच पण आता ट्रायल बेसवर हा मोबाइल टॉवर  सुरू केल्याचे नागरिकांच्या चर्चेतून आणि मोबाईल टॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून समोर येत आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी केडगाव ग्रामपंचायतीने संबंधित मोबाईल टॉवर कंपनीला नोटीस बजावली होती त्यावेळी मोबाईल टॉवरवर कोणतेही उपकरण जसे GSM जीएसएम आणि डोम बसविण्यात आले नव्हते व कामही अर्धवट अवस्थेत होते मात्र टॉवरच्या बॉक्सवर नोटीस लावूनही नंतर GSM आणि डोम बसविण्यात आले त्यामुळे संबंधित टॉवर कंपनी हि ग्रामपंचायतीलाही जुमानत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून जर केडगाव ग्रामपंचायतीला हे लोक जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न येथील राहिवाश्यांमधून उपस्थित केला जात आहे. 

याबाबत येथील काही नागरिकांनी मोबाईल टॉवर कंपनी खरंच ग्रामपंचायतीच्या नोटिशीला सिरीयस घेत आहे का? आणि ग्रामपंचायत त्यांचायसमोर इतकी हतबल का होत आहे असा सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजितकुमार शेलार पाटील यांनी बोलताना 

मोबाईल टॉवर कंपनीला काम थांबवायचे आदेश दिले असून ग्रामपंचायतीचा आदेश डावलणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर मार्गाने कारवाई होईल असे सांगितले आहे.


अजून मोबाईल टॉवर सुरू केला नाही – एरिया मॅनेजर

याबाबत संबंधित कंपनीचे एरिया मॅनेजर कानवडे यांनी बोलताना सदर मोबाईल टॉवर अजून सुरू केला नसल्याचे सांगितले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago