मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रात्री 9 वाजता घडली आहे.
रजनी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी त्यांच्या आत्महत्येने परीसरात एकच खळबळ माजली आहे.
आमदार मंगेश कुडाळकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार असून त्यांच्या पत्नीने रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. रजनी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत परीसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.