दौंड : उद्या मंगळवार दि. २९/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता भाजपा महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षात मी दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मतदारसंघात केली आहेत.
हाच निकष ठेवून भाजप आणि मित्रपक्षांनी मला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिली असून त्यानुसार मी मंगळवारी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर, योगेश टिळेकर व परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दौंड मधील छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार असून दौंड तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्याला आशीर्वाद द्यावे व काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केले आहे.