आमदार राहुल कुल यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क

दौंड : दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी राहू येथील मतदान केंद्रावर पत्नी सौ. कांचनताई कुल व मातोश्री माजी आमदार श्रीमती रंजनाताई सुभाष आण्णा कुल यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी ते पार पाडावे असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे. विकासकामांच्या मुद्द्यावर राहुल कुल हे निवडणूक लढत असून आपण केलेल्या सर्व कामांची पावती मतदार आपल्याला देतील असा विश्वास त्यांनी प्रत्येक सभेत व्यक्त केला होता.

आज २० तारखेला विधानसभेसाठी मतदान होत असून २३ तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तालुक्यात कोठेही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत.