मुंबई : शेतकरी सुखी तर राज्य सुखी या विचाराने काम करणाऱ्या केंद्र सरकारचे आमदार राहुल कुल अभिनंदन केले. राज्यातील नदीजोड प्रकल्पाची कामे तसेच कृष्णा भीमा स्थिरिकरण प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, मुळशी चे पाणी पूर्वमुखी वळविणेसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून पाणी वळविणे संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, तसेच राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण असलेले प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्याने पूर्ण करावेत व जलयुक्त शिवार टप्पा २ अंतर्गत कामांना गती देण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.
ऊस आणि कांदा या पिकाच्या बाजारभावाच्या बाबतीत दर नियंत्रणात नसल्याने ग्राहक व शेतकऱ्यांना नेहमी तोटा सहान करावा लागत आहे, त्यामुळे सुवर्णमध्य साधून निर्यात आयातीची धोरणे ठरविण्यात यावीत. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणे शक्य आहे. साखरेचा ८० टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी केला जातो तर फक्त २० टक्के वापर हा खाण्यासाठी केला जातो त्यामुळे २० टक्के वापर वगळून इतर ठिकाणी साखरेची दरवाढ केली तर शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील चांगला बाजारभाव मिळेल
एमडी या आमली पदार्थांचे निर्मिती करणारे दोन कारखान्यांच्या माध्यमातून कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात उत्पादन सुरू होते. त्यावर कारवाई झाली असली तरी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत या अमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कटिंग पान च्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री होत आहे त्यावर निर्बंध आणले नाहीत तर तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जाईल त्यामुळे याबाबत शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.
मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे उपाययोजना करीत आहे. परंतू होणारे नुकसान व भरपाई यामध्ये मोठी तफावत आहे. प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून बँक व पतसंस्थामधे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवणाऱ्या नागरिकांचे पैसे देखील सुरक्षित राहिलेले नाहीत. रूपी बँक ते ज्ञानराधापतसंस्था अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. यासंदर्भात अडकलेल्या ठेवीदारांच्या बाबतीत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.
कुरकुंभ, ता. दौंड येथील औद्योगिक क्षेत्रात मागील दोन वर्षापासून छोटे मोठे २५ हून अधिक गंभीर अपघात घडलेले आहेत, राज्यभरात मागील दोन वर्षात हजारो कामगारांचा औद्योगिक अपघातात मृत्यू झाला आहे. कामगार जखमी होण्याचे प्रमाण देखील खूप मोठे आहे. औद्योगिक प्रदूषणात वाढ होत आहे. राज्यातील १२५०० छोट्या मोठ्या उद्योगांवर शासनाने कारवाई केली असली तरी शासनाच्या अधिकाऱ्यांची असलेली नकारात्मक भूमिका व त्यामुळे वाढलेले हे अपघाताचे प्रमाण यावर लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली
राज्य सरकारने वेगवेगळ्या समाजबांधवाच्या उन्नतीसाठी १८ आर्थिक विकास महामंडळे मागील कालावधीत सुरू केली आहे. त्याना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून या सर्व समाज बांधवांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली. प्रांत व तहसीलदार यांच्या स्थानिक चौकशीच्या (स्पॉट पंचनामा) आधारे भिल्ल, वडारी, डवरी, रामोशी या सारख्या भटक्या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे, त्याच प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याची प्रक्रिया देखील सोपी करून देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.
पुण्याचा वाहतुकीची मोठी गहन झालेली आहेत, रुग्णांना वेळात हॉस्पिटल मध्ये पोहचवता येईल कि नाही याची शाश्वती राहिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ज्याप्रमाणे कोस्टल रोड, अटल सेतू, मिसिंग लिंक अशी विकास कामे केली त्याच धर्तीवर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे रिंग रोड, पुणे नगर उन्नत मार्ग, पुणे सोलापूर इलीव्हेटेड मार्ग असे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत अशी मागणी केली. महाराष्ट्रातील सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) दर जिल्हानुसार बदलतात ते समान करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.