ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधन, आमदार राहुल कुल यांच्याकडून शोक व्यक्त

पुणे : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

मंत्री जयकुमार गोरे त्यांना दादा या नावाने संबोधत. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव बोराटवाडी ता.माण येथील निवासस्थानी आणण्यात आले असून सकाळी ११:०० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी बोराटवाडी येथील स्मशान भूमीत होणार आहे.

दौंड चे आमदार राहुल कुल यांच्याकडून शोक व्यक्त

मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या दुःखद घटनेबाबत शोक व्यक्त करताना, माझे सहकारी मित्र, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे यांचे वडील भगवानराव (दादा) गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हा आघात सहन करण्याची ताकद श्री. जयकुमार गोरे व त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना.. अश्या शब्दांमध्ये शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.