: अब्बास शेख
मंत्र्यांना लाजवेल असे कार्य एक आमदार करत आहेत यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, होय हे खरं आहे, एक आमदार आपल्या कार्यातून मंत्र्यांच्या कित्येक पट पुढे निघून गेला आहे आणि त्यामुळे जनतेनेही त्यांना ‘आरोग्यदूत’ ही पदवी बहाल केली आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांना संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे राज्यातील कित्येक जिल्ह्यामधील पीडित, गरीब आणि असाध्य व्याधीशी झगडणाऱ्या रुग्णांना आमदार राहुल कूल यांनी आरोग्य निधीतून मोठी मदत केली आहे. त्यातून रुग्णांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा त्यांच्या आजपर्यंतच्या अविरत कार्याची पावती देऊन जातो.
आमदार राहुल कूल यांनी केलेल्या मदतीमुळे अनेकजण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले तर अनेकांना जगण्याची एक नविन उमेद मिळाली आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेकांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे आणि त्याबाबत लोक आपले अनुभव आवर्जून सांगत असतात.
असाच एक अनुभव दौंड तालुक्यातील भांडगाव येथे राहणाऱ्या श्री.सीताराम शेळके यांना आला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 13 वर्षीय अल्पवीन मुलगा वैभव याला जन्मजात असलेल्या अस्थिव्यंगामुळे स्वतःच पायावर चालत येत नव्हते. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या या शेतमजूर कुटुंबाला पैशाअभावी त्याचे उपचार करणे शक्य होत नव्हते. त्यांना आमदार राहुल कूल यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून दौंडचे आमदार अ़ॅड. राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला आणि आपली सर्व कहाणी कथन करून मदतीची विनंती केली.
आमदार अ़ॅड. राहुल कुल यांनी त्यांची संपूर्ण परिस्थिती जाणून घेत त्वरित त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरु केली. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये वैभवची 4 लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात आली. आश्चर्य म्हणजे किचकट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरत वैभवला नवसंजीवनी मिळाली. उपचारानंतर वैभव पहिल्यांदा त्याचा पायावर उभा राहिला तो क्षण त्याच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्यासाठी खूपच आनंदाचा होता. या आनंदाच्या क्षणी आमदार राहुल कूल यांच्या पत्नी सौ. कांचन कूल यांनी वैभवची भेट घेऊन त्याच्या तब्बेतीची विचारपूस केली. वैभव त्याच्या पायावर उभा पाहताना त्याच्या आईचा व कुटुंबाचा आनंद अवर्णनीय होता वैभव लवकर पूर्णपणे बारा व्हावा व त्याला उत्तम आरोग्य लाभावे अशा सदिच्छा यावेळी आमदार राहुल कूल यांच्या वतीने सौ. कांचन कूल यांनी दिल्या.