आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश | डेमू रेल्वे आता पुण्यापर्यंत जाणार

पुणे : पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाश्यांना आता दिलासा मिळाला आहे. दैनंदिन दौंड-पुणे-दौंड असा रेल्वे प्रवास करणाऱ्या करणाऱ्या हजारो प्रवाशांना डेमू रेल्वेने फक्त हडपसर (मुंढवा) रेल्वेस्टेशन पर्यंत जाता येत होते. त्यापुढे त्यांना पर्यायी वाहणांनी पुण्यात पोहचावे लागत होते. आता मात्र या सर्व प्रवाश्यांना दिलासा मिळाला असून ०१५२२-दौंड-हडपसर ही डेमू रेल्वे आता पुण्यापर्यंत जाणार आहे. याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचे या निर्णयाबाबत आभार मानले आहेत.


प्रवाश्यांची मागणी अण आ.राहुल कुल यांचा पाठपुरावा – दौंड स्थानकावरून सकाळी ६:१० वाजता सुटणारी ०१५२२ डिझेल (DEMU LOCAL) रेल्वे हडपसर पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते, हि डेमू हडपसर ऐवजी पुण्यापर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. प्रवाश्यांच्या वरिल अडचणीबाबत रेल्वे मंत्री, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री, यांचेशी आ.राहुल कुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि ०१५२२ – दौंड – हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती.

आ.राहुल कुल यांच्या मागणीची दखल घेत आज शनिवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ पासून ०१५२२ – दौंड – हडपसर डेमू आता पुण्यापर्यंत जाणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या या पाठपुराव्याचे प्रवासी वर्गातून आभार व्यक्त केले जात आहे.