दौंड : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दौंड विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी, महायुतीचे उमेदवार आ.राहुल कुल हे मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये दौंड तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली छत्रपती श्री. शाहू महाराज पुतळा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक अशी होऊन छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक येथे येणार आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक, दौंड याच ठिकाणी जाहीर सभा होणार असून या प्रसंगी आपले प्रेम, विश्वास व आशीर्वाद देण्यासाठी आवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आ.कुल यांच्यावतीने करण्यात आली आहे.