Categories: राजकीय

आमदार ‘राहुल कूल’ यांच्यावर मंत्रिमंडळातील नेत्यांसह संपूर्ण राज्यभरातून ‘शुभेच्छांचा’ वर्षाव

पुणे : पुणे जिल्ह्याचे आरोग्यदूत, दौंडचे आमदार ‘राहुल कूल’ यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आज प्रत्येकजण आमदार राहुल कूल यांना शुभेच्छा देताना दिसत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नुसते कार्यकर्तेच नाही तर राज्य मंत्रिमंडळातील नेत्यांनीही आमदार राहुल कूल यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रति आपले प्रेम व्यक्त केले. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार गोरे यांसह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आज दि. 30 ऑक्टोबर रोजी आमदार राहुल कूल यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या थाटमाटात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राहुल कूल यांनी हार, बुके, शाल, नारळ, केक हे आणू नये आणि भेटवस्तू आणायच्याच असतील तर शालोपयोगी पुस्तके, वह्या, पेन इत्यादी वस्तू भेट म्हणून देण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

विविध मंत्र्यांकडून आमदार राहुल कूल यांना शुभेच्छा देण्यात आल्या

संपूर्ण राज्यात आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणाऱ्या आमदार राहुल कूल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध जिल्ह्यातून अनेक जेष्ठ, वृद्ध, नागरीक सायंकाळपर्यंत येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांची भेट झाल्याचा आनंद दिसत होता. तर अनेकजण त्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत होते.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

52 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago