मुंबई : धर्मादाय रुग्णालयांना मुद्रांक व इतर सूट दिल्यानंतर, ते बंधने पाळतात का हे तपासण्याची गरज असल्याचे मत आमदार अॅड. राहुल कुल यांनी व्यक्त केले. विधानसभा सभागृहात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम सुधारणा विधेयक सुधारणा सुचविताना आमदार अॅड. कुल बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार अॅड. कुल म्हणाले कि, बंधपत्र किंवा अन्य लेखा संदर्भामध्ये धर्मार्थ दवाखाना, रुग्णालय किंवा सार्वजनिक उपयुक्ततेचे इतर कोणतेही उद्दिष्ट यासाठी वर्गणी दिली जाते, त्यासाठी मुद्रांक सूट देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता आता देखील घेतला आहे. ही चांगली गोष्ट आहे परंतु धर्मादाय रुग्णालयाच्या समितीवर मी मागील अनेक दिवसापासून काम करतोय त्यामध्ये राज्यभर अतिशय निराशजनक परिस्थिती आहे. वारंवार धर्मादाय समिती प्रमुख, विधी व न्याय राज्यमंत्र्यांच्या पासून सर्व समितीचे सदस्य चुकीच्या कामकाजाला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु रुग्णालये त्याला कोणतीही दाद देत नाहीत.
त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांना मुद्रांक सूट दिल्यानंतर, संबंधित रुग्णालये त्याचे कामकाज करीत असताना त्यांना घालून दिलेली बंधने पळून सवलती देत आहेत का यासंदर्भात राज्य शासनाने रुग्णालयांना सूचना करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
याबाबत तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.