Categories: राजकीय

शासकीय नोकऱ्यांमधील ओबीसी,भटक्या विमुक्तांच्या जागा कधी भरणार! ‘ओबीसी’ बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी ‘शासनाने’ काय पावले उचलली… आमदार ‘राहुल कुल’ यांचा विधानसभेत ‘तारांकित’ प्रश्नांचा भडीमार

मुंबई : राज्यातील शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेली ओबीसी, भटक्या विमुक्त प्रवर्ग, भटक्या जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत तसेच राज्यातील ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण देनेबाबतची शासनाची भूमिका जाहीर करावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात केली.

त्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोटयात ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून १५४२६ रिक्त पदांची माहितीची आकडेवारी २ वर्षापूर्वीची असून सद्यस्थितीत असलेला अनुशेष किती आहे, हा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात येणार आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्यातील इतर मगास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ३६ वसतिगृहे बांधण्यात येणार असून त्याची सद्यास्थित काय आहे. ही वसतिगृहाचे काही पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला.

राज्यातील ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण देनेबाबत शासनाची भूमिका काय आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला.
यावेळी उत्तर देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि, राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून सुमारे २ लाख ३० हजार पदे रिक्त असून सदर पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी कोविड मुळे दोन वर्ष कोणतीही पदभरती होऊ शकली नाही. मागील सहा महिन्याच्या कालावधीत विशेष भरती मोहीम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असून रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रकाश अबीटकर, भास्कर जाधव यांनी देखील यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

8 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago