आमदार ‘कूल’ अण मागणी ‘पॉवरफुल’! आमदार ‘राहुल कूल’ यांच्या अभ्यासात्मक मागणीने विधानसभेत अनेक प्रलंबित मुद्यांना ‘स्पर्श’

मुंबई : दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहूल कूल यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर राज्यातील व तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श करत आपली वेगळी छाप विधान सभेत उमटवली आहे. आमदार राहुल कुल हे उच्च शिक्षित असल्याने त्यांचा विविध विषयांवर गाढा अभ्यास आहे आणि विशेष करून पाणी वाटपासंदर्भात तर उत्तम अभ्यास आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार कूल यांनी तालुक्यातील रस्ते, आरोग्य, महसूल इत्यादी महत्वाच्या गोष्टींवर भर दिला. तसेच तालुक्यातील वाळू धोरणामुळे होणारे गुन्हेगारीकरण याकडे देखील शासनाचे लक्ष वेधून एक ठोस धोरण ठरविण्याची मागणी केली. या नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देण्याची मागणी देखील त्यांनी लावून धरली आहे. विधान सभेत मागण्या होतात आणि सभागृहात दिलेले अनेक अश्वासनांची मात्र पूर्तता होत नाही या मुद्द्यावर त्यांनी शासनाचे कान देखील टोचले आहेत.
एकंदरीत आमदार राहुल कूल यांनी विधानसभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आणि त्यातील अनेक मागण्यांना यश आले आहे. यातीलच एक चिबड जमिनिसारख्या महत्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घालून संबंधीत खात्यांना पत्र व्यवहार करून मिळणाऱ्या निधीमध्ये भरघोस वाढ केली हे त्यांचे यश आहे. तर संपूर्ण दौंड तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली कुरकुंभ येथील एम.आय.डी.सी तील प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घालून अधिकारी व कंपनी प्रशासन यांच्या अभद्र युतीवर प्रकाश टाकून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी शासनाला केली आहे.
आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची ठरलेली महात्मा फुले जण आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवावी जेणे करून जास्तीत जास्त गरीब जनतेला त्याचा फायदा होऊ शकेल व वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसंपासून शासनाकडे प्रलंबित असून त्याला लवकर मान्यता मिळण्याची महत्वाची मागणी त्यांनी केली आहे.
वीज प्रश्नासारख्या महत्वाच्या मुद्दयावर त्यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत ज्यामध्ये आठ तास पुरेश्या दाबाने वीज मिळत नसल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होतो, वीज बिलासंदर्भात तीन महिने स्थगिती दिली, पण तीन महिन्यांतवर काय?? हा देखील प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांसाठी एक धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली लावून धरली आहे. जेणे करून हा विषय कायमचा सुटून यातून शेतकरी वर्ग सुखावला जाईल.
वरील विविध अश्या अनेक महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास त्याची अभ्यासात्मक मांडणी करून आमदार राहुल कूल यांनी आपल्या अनेक मागण्या अधिवेशनाच्या माध्यमातून मार्गी लावल्या आहेत. कूल हे जरी विरोधी पक्षाचे आमदार असले तरी वैधानिक आयुद्धाच्या मार्गाने जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले असून आवश्यक तो निधी देखील त्यांनी मिळवला हे त्यांचे मोठे यश मानले जात आहे.