MLA Rahul Kool – दिवंगत आमदार, स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ पाटसकर यांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने घरासाठी जागा उपलब्ध करून घर बांधून द्यावे : आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



|सहकारनामा|

दौंड : दौंडचे दिवंगत आमदार, स्वातंत्र्य सैनिक स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने घरासाठी जागा उपलब्ध करून त्यांना घर बांधून द्यावे अशी मागणी आमदार राहुल कूल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

दौंड नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं ५६५ लगतची ५० x २५ अशी १२५० चौरस फूट जागा घरासाठी देण्यासाठी दौंड नगरपालिकेने ठराव क्र. ४२२, २७ डिसेंबर १९९० रोजी मंजूर होऊन देखील सदर जागेवरील आरक्षण व अन्य प्रशासकीय कारणांने आजतागायत स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबियांना हि जागा मिळालेली नाही.  

वास्तिविक पाहता स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांनी दौंड उपजिल्हा रुग्णालय तसेच दौंड एसटी स्थानकासाठी १९९० दरम्यान स्वतःचा मालकीची ७ एकर जागा कवडीमोल दराने दिली व जागेचा प्रश्न सुटून दौंड उपजिल्हा रुग्णालय तसेच दौंड एसटी स्थानक उभे राहिले परंतु गेले ३ दशके स्वातंत्र्य सैनिक स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबियांना याबाबत कुठलीही शासकीय मदत मिळाली नसून अद्यापही त्यांचे कुटुंबियांना स्वतःच्या मालकीचे घर नसून ते भाडयाच्या खोलीमध्ये वास्तव्यास आहेत हि अत्यंत खेदाची बाब आहे.  

याबाबत दिवंगत आमदार स्व.सुभाषआण्णा कुल, माजी आमदार श्रीमती. रंजनाताई कुल यांनी देखील सन १९९० पासून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरवा केला असून राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून दिवंगत आमदार, स्वातंत्र्य सैनिक स्व. जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबियांना घरासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन विशेष बाब म्हणून पक्के घर बांधून द्यावे अशी मागणी आमदार राहुल कूल यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.  उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री मा. ना.   अजित दादा पवार , नगरविकास मंत्री मा. ना.  एकनाथ शिंदे , नगरविकास राज्यमंत्री मा. ना.  प्राजक्त तनपुरे  यांचेकडे  निवेदनाद्वारे केली आहे.