Categories: Previos News

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी, शिरूर तालुक्यामध्ये खळबळ

शिरूर : शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र मिळाले असून त्यांना व त्यांच्या परिवाराला यात धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नगरसेवक, उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

शिरूर-हवेलिचे आमदार अशोक पवार यांनी त्यांना हे धमकीचे पत्र मिळाल्याचे त्यांनी सांगितले असून यात एक माजी नगरसेवक मल्लाव याचा संदर्भ देण्यात आल्याने शिरूर मधील वातावरण तप्त झाले आहे.

अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या नियोजनाने नुकतेच शिरूर च्या नगरपालिकेच्या इमारतीचे आलिशान बांधकाम करण्यात आले आहे, या इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शिरूर चा विकास झपाट्याने वाढत असल्याने काहींच्या पोटात दुखत असून त्यामुळे हे लोक असले भ्याड कृत्य करत असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. गृहविभागाने हे कोण लोक आहेत हे शोधून काढून त्यांच्यावर योग्य ती करवाई करावी अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago