टाकळी हाजीची खेळाडू मिजबा मुजावर हीची अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

शौकत मुजावर

पुणे : मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स ॲण्ड स्पोर्ट्स गव्हरमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अयोजीत देशात वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असो.अयोजित अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धा महाराष्ट्रात किकबॉक्सिंग स्पोर्टस असो.महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत मा.बापूसाहेब गावडे उच्च.माध्य विद्यालय टाकळी हाजी येथील खेळाडू मिजबा मुजावर हिने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले असून तिची वेस्ट झोन स्पर्धेत निवड झाली आहे. राज्यातून निवड झालेल्या या महिला खेळाडू मध्यप्रदेश येथे खेळणार आहेत.

खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धा महाराष्ट्रात यशस्वी संपन्न होण्यासाठी राज्य सदस्य, जिल्हा प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले. खेल से ही पहचान हे ब्रीद वाक्य खरे करत राज्यातील ग्रामीण खेळाडू देखील राष्ट्रीय पातळीवर किकबॉक्सिंग खेळात नावलौकिक मिळवत आहेत. आमची संघटना ही एकविध असून शासनाच्या सर्व स्पर्धा यशस्वी पार पाडत आसल्याचे किकबॉक्सिंग स्पोर्टस असो.राज्य अध्यक्ष निलेश शेलार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

विजेत्या खेळाडूंना संघटनेचे चेअरमन तथा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असो. पुणे ग्रामीणचे अध्यक्ष खेलरत्न पुरस्कार प्राप्त सतिश राजहंस यांनी मार्गदर्शन केले आहे. मृत्युंजय फाईट क्लब इंडिया चे संस्थापक प्रमोद फुलसुंदर हॉटेल विश्वपॅलेस उदयोग समुहाचे पै.तुकाराम उचाळे, राष्ट्रीय पंच शेख शौकत मुजावर, विक्रांत रणसिंग, अक्षय पवार यांनी प्रशिक्षण दिले.
दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी पासुन इंदोर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या केंद्रशासनाच्या खेलो इंडिया वुमेन्स किकबॉक्सिंग झोनल टूरलामेण्ट २०२५/२६ या वेस्ट झोनसाठी मिजबा मुजावर हीची निवड झाली असून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.