Categories: Previos News

MIT ADT विद्यापीठाचे क्रिडा संचालक पद्माकर फड यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असो. च्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती



 

लोणीकाळभोर : रियाज शेख

 एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराज बाग, लोणी काळभोर येथील क्रिडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पद्माकर फड यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या निवड समिती सदस्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 

त्यांच्या नियुक्तीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमच्या संचालिका प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्यासह सर्व विभागाचे डीन, डायरेक्टर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 

श्री. पद्माकर फड यांनी 1989 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदक जिंकले आहे. तसेच भारत विरोध थायलँड बॉक्सिंग स्पर्धेतमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.1983 ते 1988 दरम्यान झालेल्या बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ आणि वरिष्ठ गटामध्ये त्यांनी 5 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदक जिंकले असून महाराष्ट्र राज्याचे सलग 7 सुवर्ण पदक विजेते आहेत. 

तसेच त्यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहेत. 2002 मध्ये डब्लिन, आयर्लंड येथे झालेल्या जागतिक सैन्य बॉक्सिंग चँपियनशिपसाठी त्यांनी भारतीय बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही काम पाहिले आहे. 

नेताजी सुभाष नॅशनल इस्टीट्युट ऑफ स्पोर्टस् पटियाला येथून त्यांनी 1991 मध्ये एक वर्षाचा कोचिंग डिप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले आहेत. 2008 साली पुणे येथे झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहाय्यक प्रोजेक्ट अधिकारी म्हणून ही काम केले आहे. 

आर्मी स्पोर्टस् इस्टीट्युट, पुणेचे प्रथम मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. सैनादलमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे अनेक मुष्टीयुद्धे तयार केले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

58 मि. ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago