सुधीर गोखले
सांगली : काल सायंकाळी सहा वजन चार मिनिटांनी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ चे सॉफ्ट लँडिंग करून एक नवा इतिहास रचला या यशस्वी मोहिमेचे काल जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगलीमध्ये काही ठिकाणी नागरिकांना जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटप केली तर काही ठिकाणी पेढे वाटप झाले.
काल दिवसभर जिल्ह्यात चांद्रयान ३ मोहिमेबाबत उत्सुकतेचा माहोल होता जस जसे सायंकाळचे सहा वाजत आले उत्सुकता आणखी शिगेला पोचत गेली आणि अखेर विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग यशस्वी केले सर्वत्र जल्लोष साजरा झाला फटाक्यांच्या आतिषबाजी सह भारत माता कि जय च्या घोषणाबाजीसह सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले.
सांगलीतील पंचमुखी मारुती चौकात नागरिक जागृती मंच चे सतीश साखळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. तर स्टेशन चौकासह वखार भाग येथे काही व्यापारी आणि नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले.
या मोहिमेचे थेट प्रक्षेपणाची सोय इस्लामपूर येथे निशिकांत भोसले पाटील यांनी केली तहसील चौकात या मोहिमेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली आणि भारत माता कि जय च्या घोषणा दिल्या.
जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यामधून साखर पेढे वाटप मोठ्या प्रमाणावर करण्यात आले तर फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून गेला. सोशल मीडिया वर सर्वत्र ISRO च्या सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदनाचे बॅनर झळकले तर रात्रभर मिम्स चा पाऊस पडला. आणि यापुढील ISRO च्या मोहिमांना शुभेच्छा दिल्या गेल्या.