सुधीर गोखले
सांगली : मिरज येथील मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालय लवकरच कात टाकणार आहे. राज्यातील सर्वात जुन्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयांपैकी एक असलेले आणि संपूर्ण देशामध्ये नावलौकिक असलेले असे मिरजेचे शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय आहे. जवळ जवळ १२०० विद्यार्थी आज या महाविद्यालयात एम बी बी एस चे शिक्षण घेत आहेत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ३०० असे सुमारे १५०० विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहेत.
पण वसतिगृहाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणीचे ठरत असून एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहाची इमारत कमी पडत आहे त्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने राज्य सरकार कडे प्रस्ताव दिला होता त्याप्रमाणे नव्या वसतिगृहासाठी तब्ब्ल ६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्यामधून २ वसतिगृह २ प्रॅक्टिकल हॉल २ लेक्चर हॉल बांधण्यात येतील नव्या वसतिगृह इमारतींमुळे ४०० विद्यार्थ्यांची सोय होईल. सध्या महाविद्यालयातील ग्रंथालय अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तसेच रुग्णालय आवारात सांडपाणी निचरा आणि भुयारी गटारांसाठी १८ कोटींचा निधी मंजूर झालाय पण अद्याप प्रशासनाकडे वर्ग नाही. तसेच अग्निशमन यंत्रणाही अद्यावत करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे पूर्वीच्या अग्निशमन यंत्रणेमध्ये सुधारणा होणार आहे.
बऱ्याच वर्षांपासूनची नवीन एम आर आय मशीन ची मागणी होती पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ती पूर्ण झाली कोट्यवधी रुपयांचे हे मशीन पूर्णपणे परदेशी बनावटीचे असल्यामुळे टेंडर लवकरच निघेल चांगल्या दर्जाची मशीन असल्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.
रुग्णालय लवकरच सौरऊर्जेवर
मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सोलापूर सांगली जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात येथील उपचार हे अत्यंत कमी दरामध्ये आहेत तसेच उपचार मोफत आहेत जिल्हा नियोजन समिती कडून सुमारे ३ कोटी रु सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत रुग्णालय आणि वसतिगृह हे आता ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.
राज्यातील पहिली स्किल लॅब मिरज सिव्हिल मध्ये… विद्यार्थी विद्यार्थिनींना पुस्तके वाचूनच प्रशिक्षण घेतले जाते मात्र स्किल लॅब झाल्यावर प्रत्यक्ष उपचारांबाबत प्रॅक्टिस करून प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे स्किल लॅब ची भूमिका हि विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयासाठी महत्वाची राहणार आहे. नियोजन समिती कडून यासाठी साडे तीन कोटींचा निधी मंजूर झाला होता आता या लॅब चे कामही पूर्णत्वाकडे आहे.
सुपर स्पेशालिटी चा प्रस्ताव
गतवर्षी या रुग्णालयाला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांनी भेट दिली होती त्यावेळी या रुग्णालयाचा सुपर स्पेशालिटी च्या प्रस्तावर चर्चा झाली होती त्याप्रमाणे प्रशासनाने केंद्र सरकार कडे तसा प्रस्ताव पाठवला होता सुपर स्पेशालिटी साठी अर्थात भरीव निधीची गरज लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदीलही दाखवला आहे जर निधीला मंजुरी मिळाली तर न्यूरोसर्जन युरॉलॉजि, ट्रामा सेंटर कॅन्सर वरील उपचार पोटाचे विकार यासह विविध विभाग एकाच छताखाली येतील आणि रुग्णाची पळापळ थांबेल वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सुधीर नणंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रुपेश शिंदे आणि त्यांची टीम रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे.