पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमासयवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत या पिडीत मुलीच्या आईने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता सदर आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरात आला त्यावेळी त्याने तिच्या मुलीचा विनयभंग केला आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर काहींनी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला मात्र यवत घटनेवरून बोध घेतलेल्या यवत पोलिसांनी वेळीच सावध पवित्रा घेत सोशल मिडियावर विष पेरणाऱ्या प्रवृत्तीना कडक ईशारा दिला आणि त्यामुळे सोशल मिडीययावर दोन जातींमध्ये तेढ निर्माण करु पाहणाऱ्यांना चांगली जरब बसल्याचे पहायला मिळाले.
ही तर विकृती त्यामुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणे ही समाज कंटक विकृती – दररोज कुठे न कुठे अपराधी घटना घडत असतात. Ya घटना वयक्तिक हेवेदावे, वाद आणि मानसिक विकृतीमुळे घडत असतात. त्यामुळे गुन्हा करणारा दोषी असतो, मात्र आरोपी ज्या समाजाचा आहे तो समाज यात कधीच दोषी नसतो. प्रत्येक जाती, धर्मात पाच,दहा टक्के अश्या विकृती सापडतात ज्यामुळे त्या समाजाला शरमेने मान खाली घालावी लागते. मात्र यात संपूर्ण समाजाला दोष देणे योग्य नाही. अन्यथा प्रत्येक समाज हा दोषी ठरेल यात शंका नाही.







