मुंबई : वृत्तसंस्था
कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांनी ए.आय.एम.आय
एम.चे नेते वारिस पठाण यांच्याविरूद्ध भडकाऊ भाषणे करण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. दंगा भडकावण्याच्या उद्देशाने लोकांना भडकविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी पठाण यांच्या विरोधात आयपीसीच्या कालामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
16 फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या कलबुर्गी येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आयोजित मेळाव्यात बोलताना त्यांनी आम्ही आपण एकत्रितपणे पुढे जायला हवे. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, आम्हाला फक्त विचारूनच गोष्टी मिळत नाहीत, ती घेऊन जायला पाहिजे. लक्षात ठेवा आम्ही 15 कोटी आहोत परंतु 100 कोटी भारी आहोत असे विधान केले होते. पठाण यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वारिस पठाण यांच्या या विधानावर व्यापक टीका झाली.
# पक्षाच्या नेत्यांनीही केला निषेध..
या वादग्रस्त विधानावर नेते आणि कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना एम.आय.एम महाराष्ट्र युनिटचे प्रमुख आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा पक्ष पाठिंबा देत नाही. त्यांच्या या वक्तव्याबाबत पक्ष त्यांच्याकडून जाब विचारेल. पुढे बोलताना त्यांनी पक्षातील वक्त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याबद्दल आचार संहिता आणणार असल्याची सांगितले.