Categories: पुणे

दुग्ध व्यावसायिक पारगाव येथे ‘रास्ता रोको’ करणार

दौंड : दुग्ध व्यवसायिकांकडून पारगाव (ता. दौंड) येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ नेते पोपटराव ताकवणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने दुध दर कपात केले असून त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध दर कपात होत आहे मात्र चाऱ्याचे दर गगणाला भिडत आहे. त्यामुळे दूध दर वाढ हा एकमेव पर्याय असून त्यासाठी हा रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत दौंड तहसीलदार आणि यवत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने दुध दर कपात केले असून दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याचा आरोप दुग्ध व्यवसायिकांकडून करण्याय येत आहे. या वर्षभरात प्रति लिटर ११ रुपयेप्रमाणे दुधाचे दर कमी झाले आहेत. मात्र पशुखाद्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. दुग्ध व्यवसायाच्या इतर सर्व बाबीमध्येही खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय कर्जाच्या खायित गेला आहे. कर्ज असणाऱ्या व्यवसायिकांचे कर्जाचे व्याज व हप्ते थकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे वरील सदर विषयांचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे आणि यासाठी पारगांव परिसरातील सर्व दुग्ध व्यावसायिक सोमवार दि.२७ रोजी शिरुर-सातारा रोडवर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले असून शासनाने यात लक्ष देऊन आमच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago