Categories: Previos News

..तर कुरकुंभ MIDC तील ‛त्या’ कंपन्यांवर कारवाई : आ.राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती केमिकल या कंपनीला पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली होती, अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने हि आग आटोक्यात आणली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आज दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घटनास्थळी भेट दिली. 

या वेळी आमदार कुल यांनी बोलताना  आगीच्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ MIDC मध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यामध्ये अनेकदा यांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. तेव्हा कुरकुंभ परिसरातील नागरिकांचा व कामगारांचा सुरक्षेचा दृष्टीने आवश्यक उपाययोजनांच्या तातडीने अंमलबजावणीची गरज अधोरेखित झाली आहे असे त्यांनी सांगितले.  

यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत  MPCB व MIDC च्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांची सुरक्षा तपासणी करणे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन न करत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कार्यवाहीची मागणी आपण करणार असल्याचे आ.कुल यांनी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

4 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago