दौंड : सहकारनामा ऑनलाइन
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती केमिकल या कंपनीला पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली होती, अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने हि आग आटोक्यात आणली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आज दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घटनास्थळी भेट दिली.
या वेळी आमदार कुल यांनी बोलताना आगीच्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ MIDC मध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यामध्ये अनेकदा यांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. तेव्हा कुरकुंभ परिसरातील नागरिकांचा व कामगारांचा सुरक्षेचा दृष्टीने आवश्यक उपाययोजनांच्या तातडीने अंमलबजावणीची गरज अधोरेखित झाली आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत MPCB व MIDC च्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांची सुरक्षा तपासणी करणे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन न करत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कार्यवाहीची मागणी आपण करणार असल्याचे आ.कुल यांनी सांगितले.