Categories: Previos News

‛MIDC’तील मॅनेजरचे हातपाय तोडण्यासाठी ‛दीड लाखांची’ सुपारी, पाच जणांवर गुन्हा दाखल



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दिनांक 30 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मारुती सुझुकी एस क्रॉसमध्ये बसून डोंगशीन कंपनीचे सीनियर जनरल मॅनेजर मुथया सुबय्या बडेदरा हे घरी जात असताना त्यांना दोन इसमांनी मोटर सायकलवर येऊन अगोदर गाडीची धडक दिली व नंतर आणखी दोघे जण येवुन हातात हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरला दोन्ही पायाच्या नडगीवर जोरात मारून फ्रॅक्चर केले होते. याबाबत चार अज्ञात इसमानवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. त्याचा तपास वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते. 

दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक माननीय पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकास करण्याच्या सुचना दिल्या यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमी दाराच्या मार्फतीने तसेच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली त्यामधील १ ) करणकुमार चल्ला मत्तु वय २३ रा. गांधीनगर देहुरोड, २ ) बालाजी रमेश मुदलीयार (वय२७ रा. MB कॅम्प देह रोड,) ३ ) राकेश शिवराम पेरूमल (वय२५ रा. MB कॅम्प देहुरोड) हे आरोपी यांना ताब्यात घेतले असून ४ ) मुस्ताक जमील शेख वय २५रा. गांधीनगर देहुरोड यास कोरोना  झाले असल्याने व उपचार घेत असल्याने ताब्यात घेण्याची तजवीज ठेवली आहे सदर आरोपीतांकडे सखोल चौकशी करता चौकशीमध्ये आशिष ओव्हाळ (रा.विकास नगर ,देहूरोड,पुणे) यांनी आम्हाला दीड लाखाची सुपारी देऊन मला एक डोण्गशीन कंपनीचा  मॅनेजर त्रास देत आहे तुम्ही त्यास फॅक्चर करा असे सांगून सुपारी दिली असल्याबाबत चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली 

API पृथ्वीराज ताटे 

ASI विजय पाटील

HC प्रकाश  वाघमारे

HC सचिन गायकवाड 

PN गणेश महाडिक  स्थानिक गुन्हे शाखा

 यांनी केली आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago