Categories: Previos News

कुरकुंभ MIDC मधील शिवशक्ती ऑक्सलेट कंपनीला भीषण आग, मोठी वित्त हानी… असा आहे घटनाक्रम



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (V.गायकवाड)

कुरकुंभ(ता.दौंड) औद्योगिक वसाहती मधील शिवशक्ती ऑक्सलेट प्रा.लि या कंपनीला गुरुवार दि.०१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान भीषण आग लागली होती. आग विझविण्यासाठी कुरकुंभ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, बारामती एमआयडीसीची एक गाडी, दौंड नगरपालिका तसेच औद्योगिक वसाहतील एका कंपनीची गाडी अशा एकूण पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयन्त करत आग आटोक्यात आणली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, कुरकुंभ पोलीस पाटील रेश्मा शितोळे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत आगीच्या घटनेचा संदेश देत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे, यामुळे या औद्योगिक वसाहतीने जगाच्या नकाशावर ठळकपणे लक्ष वेधले आहे. 

दरम्यान दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की, सदर कंपनी मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक दिसून येत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये सदर स्फोटामुळे गावाला तसेच इतरांना कोणताही धोका नसून कंपनी मधील सॉलव्हटं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली आहे,असे सांगितले. 

तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले असून कंपनीत काम करणाऱ्या 10 ते 12 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे, मध्यरात्री ही आग लागल्याने परिसरात आगीचे लोटचे-लोट दिसत होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

19 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago