खेडच्या लोटे MIDC मध्ये भीषण स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू तर 6 गंभीर जखमी



|सहकारनामा|


खेड : खेड तालुक्यात लाेटे MIDC मध्ये विविध कारणांमुळे स्फाेट हाेण्याचे प्रकार काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. आज रविवारी सकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी आग लागून तीन जनांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हा स्फोट एमआयडीसी मध्ये असणाऱ्या समर्थ केमिकल कंपनीत झाला असून यात तीन जनांचा बळी गेला आहे तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तीन जखमींना मिरज येथे तर अन्य जखमींना जवळच असणाऱ्या एका खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

औद्योगिक वसाहतींमध्ये स्फोट होऊन आग लागण्याची हि पहिलीच वेळ नसून या अगोदरही काही महिन्यांमध्ये चार ते पाच वेळा अशा घटना घडून कामगारांचा मृत्यूही झालेला आहे. 

हे स्फोट नेमके कशामुळे झाले याचा शोध घेतला जात आहे. स्फोट होऊन आग लागल्यानंतर  अग्निशमन दल तसेच खेड येथील अग्निबंब हि घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.