रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ MIDC तर्फे रक्तदान शिबिर, 125 रक्तदात्यांचा सहभाग



दौंड (कुरकुंभ) : सहकारनामा (आलिम सय्यद) 

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एम.आय.डी.सी इमारत येथे (ता.२२) रोजी रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम.आय.डी.सी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी विविध कंपन्यांमधील कामगार, नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. 

ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तपेशी तयार होत नाही अशा रुग्णांना दर महिन्याला दोन रक्ताच्या बाटल्या द्याव्या लागतात.  रक्तपेशी तयार न होणे याला थँलेशिमिया म्हणतात. अशा रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम.आय.डी.सी यांनी पुढाकार हे शिबिर घेतले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून येणाऱ्या काळात असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष फुलचंद ढोरे यांनी सांगितले. 

रक्तदान करण्यासाठी कुरकुंभ येथील विविध मंडळे, तसेच महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील विविध कंपन्यांच्या कामगारांनी रक्तदान करून या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला आहे. या रक्तदान शिबिरात एकूण १२५ रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला रोटरी क्लबच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष  फुलचंद ढोरे, सचिव मनिष आग्रवाल, विकास टोपले, विनोद शितोळे,  रवी नागीया, योगीनी पटेकर, शंशीकात पाटील, सुनिल ढोबरे, अमोद पानसे, तसेच कंपन्यांचे संचालक, मॅनेजर, कुरकुंभ, पांढरेवाडी ग्रामस्थ, विविध कंपनीतील कामगार व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.