|सहकारनामा|
पुणे : दि 03/08/2021 रोजी 4 प्रवाशांना लातूर ते मुंबई या एसटी बस मधून सोलापूर ते पुणे हायवेने प्रवास करीत असताना 4 अनोळखी इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करून एसटी बसला गाडी आडवी लावून फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना गाडीतून खाली घेऊन त्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे जवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण रू 1,12,36,860/- रू किमतीचा मुद्देमाल लुटलेले बाबत तक्रार दिली होती .
सदर गुन्ह्यातील इतर तीन आरोपी व गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमाल यापैकी 1 कोटी 54 हजार 540 किमतीचा मुद्देमाल हा यापूर्वी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.पोलीस अधीक्षक, डॉ. श्री.अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सदर गुन्ह्यातील इतर आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या नुसार पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा फौज तुषार पंधारे,पो. हवा. जनार्धन शेळके, पो. हवा. राजु मोमीन,पो. हवा. अजित भुजबळ,पो. ना. मंगेश थिगळे, चा. सहा. फौज. मुकेश कदम यांचे तपास पथक तयार करून तपास कामी रवाना केले होते.
सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण वरून व गोपनिय बातमी दाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी नामे हर्षद विलास मतकर (वय 23 वर्षे,राहणार-तळवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा-सातारा) हा खेड शिवापूर टोल नाका येथे येणार आहे अशी बातमी मिळालेने त्यास स्थानिक गुन्हे शाखेकडील वरील पथकाने टोलनाक्याजवळ सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हर्षद विलास मतकर असे सांगून त्याने सदरचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, डॉ. श्री अभिनव देशमुख सो, मा. बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल दस सो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट, सपोनी सचिन काळे, सहा. फौज. पंदारे,पो हवा. जनार्दन शेळके,
पो. हवा. राजू मोमीन, पो.हवा.अजित भुजबळ, पो. ना. थिगळे, चालक सहा.फौज. मुकेश कदम यांनी केली आहे.