पारधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सुधीर गोखले

सांगली (शिराळा) : नेहमी मुख्य प्रवाहापासून लांब राहिलला समाज अशी प्रतिमा बनलेला आदिवासी पारधी समाज आता मुख्य प्रवाहामध्ये सामावू पाहात आहे याची प्रचिती नुकतीच पाहायला मिळाली.

शिराळा येथे दहावी आणि बारावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला या समाजातील मुला मुलींचा सत्कार समारंभ प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शिराळ्याच्या तहसीलदार शामल खोत पाटील गटविकास अधिकारी संतोष राऊत दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाचे सुधाकर वायदंडे उपस्थित होते.

दहावी मध्ये उत्तीर्ण कोमल टारझन पवार, निर्जला टारझन पवार, विठ्ठल इकबाल पवार तसेच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले परवाना सुनील काळे, आर्यन सुनील काळे अकरावी मध्ये उत्तीर्ण अमृता राकेश काळे, यश राकेश पवार, आदर्श अमर काळे, इर्शाद इकबाल पवार यांचा सत्कार करून प्रांताधिकार्यांनी त्यांना शामची आई हे पुस्तक भेट दिले यावेळी प्रांत खिलारी म्हणाले कि, ‘आदिवासी पारधी समाजातील नव्या पिढीने आता शिक्षण घेणे काळाची गरज असून गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडले पाहिजे तुमच्या शिक्षणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे पारधी समाजातील मुले मुली शिकत आहेत हि खरंच कौतुकाची बाब आहे शासनातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल’.

दलित महासंघाचे सुधाकर वायदंडे म्हणाले,’आदिवासी पारधी समाज शिक्षण आणि अन्य हक्कांपासून वंचित राहिला आहे समाजात रूढी परंपरा अंधश्रद्धा यामध्ये गुरफटला गेला असून आज अखेर आम्ही अनेक प्रबोधनात्मक कार्याद्वारे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले अजूनही सुरु आहेत’.
यावेळी दिनकर नांगरे, गंगाराम तंबोरे, पारधी हक्क अभियानाचे अध्यक्ष टारझन पवार, इंद्रजित काळे राकेश काळे उपस्थित होते.