Memu in Daund Pune – आमदार ‛राहुल कुल’ यांनी दाखवला ‛मेमु’ ला हिरवा ‛झेंडा’



– सहकारनामा

दौंड : पुणे – दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे  ‘दौंड – पुणे’ इलेक्ट्रिक लोकल ट्रेन चे स्वप्न आज साकार झाले असून आज दि.8 एप्रिल रोजी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड – पुणे प्रवासी संघांच्या सहकाऱ्यांसमवेत हिरवा झेंडा दाखवला आणि बहू प्रतीक्षीत ‘दौंड – पुणे’ पहिल्या इलेक्ट्रिक (मेमु) लोकल ट्रेन सेवेला सुरुवात झाली. अनेक अडचणींवर मात करीत अखेर मेमू सेवा सुरु झाल्याबद्दल आ.कुल यांनी प्रवासी बांधवांचे अभिनंदन केले. 

दौंड-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना, विदयार्थी मित्रांना याचा फायदा होणार आहे.

या लोकल सेवेमुळे भविष्यात दौंड शहर पुण्याचे उपनगर म्हणून पुढे येण्यास मदत होणार आहे. ‘दौंड – पुणे’ पहिल्या इलेक्ट्रिक (मेमु) लोकल ट्रेन सुरु करण्याच्या मागणी बरोबरच  भविष्यातील गरज लक्षात घेता लोकल सेवेच्या कमीत कमी १२ फेऱ्या व्हाव्यात अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. पीयूषजी गोयल यांचेकडे आपण केली असल्याचे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले