नवी दिल्ली : माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सदाभाऊ खोत, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून कर्जपुरवठा करणे असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे माजी राज्यमंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे साखर कारखान्यांवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने आकारलेला प्राप्तिकर रद्द करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला त्याबद्दल देखील देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले.
केंद्रातील सरकार हे निश्चितपणाने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल तसेच शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल या दृष्टीने हे सरकार काम करेल, असे पंतप्रधानांनी यावेळी अश्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी विधेयक आणुन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले होते. परंतु शेतकऱ्यांनी याला विरोध केल्यामुळे ती विधेयके मागे घ्यावी लागली. मात्र जरी हे तीन कृषी कायदे मागे घेतले गेले असले तरी देशातील शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी सर्व स्तरावरती मदत केली जाईल, असा विश्वास
भेटीदरम्यान पंतप्रधानांनी दाखवला.