दौंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा | पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, अनिता पठारे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान पदक

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील रहिवाशी पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड तसेच दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दौंड च्या कन्या, पोलीस कर्मचारी अनिता पठारे यांना त्यांनी बजाविलेल्या उत्तम कामगिरी बाबत पोलीस महा संचालकांचे सन्मानपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बाबत दौंड तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

आरक्षणात अडचण निर्माण करणारे नेमके कोण..? पहा उत्तर

पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे 2000 साली पुणे शहर पोलिस दलात भर्ती झाले. त्यानंतर त्यांनी लाचलूचपत विभागात महत्वाची कामगिरी बजावली. खात्याअंतर्गत त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत  पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले. यानंतर त्यांनी मुंबई रेल्वे, विशेष सुरक्षा विभाग यासह सातारा, खंडाळा, हडपसर येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून काम करत असताना विशेष कामगिरी बजावली. त्यांच्या विशेष कार्यामुळे त्यांना पोलिस निरीक्षक या पदावर बढती मिळाली असून सध्या ते नानविज येथे पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

महिला पोलिस अधिकाऱ्याचा विशेष सन्मान पदकाने गौरव – श्रध्दा पांडुरंग पठारे यांचाही सन्मान करण्यात आला असून त्या 1992 मध्ये पोलीस दलात सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे भरती झाल्या. त्यांनी दौंड येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयात शिक्षण घेवुन कब्बड्डी खेळात राष्ट्रीय पातळी पर्यंत मजल मारली. पोलिस भरती होताना त्यांना स्पोर्ट्स कोट्याचा फायदा झाला.  सोलापूर शहर, पूणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हा व शेवटी पूणे रेल्वेत पोलीस म्हणून सुमारे 17 वर्षापासुन त्या कार्यरत आहेत.

त्यांना 1996-97 मध्ये सोलापूर पोलीस दलात सर्वोत्कृष्ट महिला पोलीस म्हणून सन्मानित करण्यात आले होते. सुमारे 14 वर्ष सोलापूर शहर पोलीस खात्यात त्यांनी नोकरी केली. आता सध्या पूणे रेल्वे अंतर्गत दौंड रेल्वे पोलीस ठाण्यात त्या म.पो. हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या सन्मानाबाबत विचारले असता, मी माझे प्रथमता आई बाबा, गुरूजन वर्ग व छोट्या मोठ्याच्या अर्शिवादाने व विघ्नहर्ता, स्वामी समर्थाचे कॄपेने आज मी मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई याचे पदकाची मानकरी ठरले आहे. मी पोलीस खात्यात अद्याप पर्यंत 32 वर्ष निष्कलंक सेवा बजावली आहे.

प्रमाणीकपणे, निस्वार्थपणे सेवा करत आहे. हे सर्व करीत असताना मला अडचणीही आल्या तरी देखील त्या अडचणीवर मात करून मी 2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा पास झालेली आहे. त्याची यादी लवकरच जाहीर होईल आणि आपण अधिकारीपदी रुजू होऊ असा विश्वास अनिता पठारे यांनी व्यक्त केला.