अहमदनगर : अहमदनगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीची उकल केल्याने कासीम खान मस्जिदच्या ट्रस्ट व जमात – ए – इस्लामी हिंदी अहमदनगरच्या सर्व अध्यक्ष-उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांच्या अंगावर कौतुकाची थाप टाकली आहे. कासीम खान मशिदीत दि.२८ नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती. यामध्ये मशिदीतील कपाट ड्रिल मशीनने तोडून त्यातील ७७ हजार १०५ रुपयांची रोकड चोरी करण्यात आली होती. मुश्ताक पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती.
सदर प्रकरणात खरी मात्र तपासाचे मोठे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या टीमसह मशिदीत झालेल्या चोरीच्या स्थळाची बारकाईने तपासणी करत काही नोंदी घेतल्या.यात काही बाबींची त्यांनी नोंद केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर आगोदरच कापल्याने चित्रीकरण होऊ शकले नाही. मस्जिदच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून काही पूरक माहिती मिळवली. यात गुन्ह्याशी निगडीत बरेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यानंतर गुन्ह्याच्या उकलीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पथक रवाना केले. तेथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून रोकड जप्त केली.
दोन दिवस तपासात सतत सातत्य ठेवल्याने या चोरीची उकल शक्य झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी प्रसार माध्यमांना दिली.आपल्या कला कुसरीने सातत्य ठेऊन मशिदीतील चोरीची उकल केल्यामुळे कोतवाली पोलिसांचे कौतुक करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, शाहीद शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांचा मुश्ताक पठाण, नदीम शेख, मुश्ताक सर, मुबीन खान, मुनाफ शेख, जहीर सय्यद, डाॅ. ईकराम काटेवाला, आमीर सय्यद आदींनी सन्मान केला.