दौंड च्या मुलीला सासरच्या मंडळींनी बारामतीच्या मासाळवाडी शेत तळ्यात बुडवून मारले

बारामती : दौंड तालुक्यातील नामदेव बबन करगळ (रा. गिरीम ता. दौंड) यांची यातील मुलगी सुरेखा भाउसाहेब गडदरे हिला बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे असणाऱ्या शेत तळ्यात तीच्या सासरच्या मंडळींनी तीचे हात ओढणीने बांधून तिला पाण्यात बुडवून मारले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी सुरेखा हिचा आरोपिंनी शाररीक व मानसिक छळ, जाचहाट करून तिला त्रास दिला. तसेच तिचे पती
१) भाउसाहेब महादेव गडदरे सासु २) ठकुबाई महादेव गडदरे (दोघे रा. मासाळवाडी) यांनी मासाळवाडी येथील
तिच्या घराजवळ असलेल्या शेततळयामध्ये
तीचे दोन्ही हात लाल लाल रंगाच्या ओढणीने बांधुन तिला पाण्यात बुडवुन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

या प्रकरणात आशा सोनबा कोकरे आणि सोनबा चंदर कोकरे यांचाही समावेश असल्याचे म्हटले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपिंवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई लवटे करीत आहेत.