यवत येथे विवाहितेला अमानुष मारहाण.. पती, सासू, सासऱ्यांसह यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे विवाहितेचा अमानुष छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती इरफान बेग (रा.यशवंतनगर, यवत ता. दौंड) याच्यासह त्याची आई, वडील, बहिण आणि बहिणीच्या मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला झालेल्या अमानुष मारहानिमध्ये तिच्या डोक्याचे केस मोठ्या प्रमाणावर उपटण्यात आल्याने मारहाण किती भयंकर असेल याचा अंदाज येत आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सांगितलेल्या माहितीनुसार, राहू येथील या पीडित महिलेचा विवाह इरफान युसूफ बेग (रा.यशवंतनगर, यवत ता. दौंड) याच्यासोबत 2017 साली मुस्लीम रिती रिवाजाप्रमाणे झाला होता. पीडित महिलेला पती इरफान याच्यापासून 6 आणि 4 वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. ती सध्या यवत (ता.दौड जि.पुणे) येथे पती इरफान, सासरे युसुफ रहिम बेग, सासु, पतीचा भाचा यांच्या सोबत एकत्रित राहत होती. तिचा विवाह झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये तिचे पती व सासु हे वारंवार तिच्या सोबत किरकोळ कारणावरून भांडण करून माहेरून दोन लाख रूपये घेवुन येण्यास सांगत होते. तसेच तिला मुलगा होत नाही म्हणुन तिचे पती, सासु, सासरे व नणंद यांनी जास्त त्रास देणे चालु केले. पीडितेचे वडील 2008 साली मयत झाल्याने माहेरी आई एकटीच असते त्यामुळे होणा-या त्रासाबाबत पीडितेने कोणास काही एक सांगतले नाही. वरील सर्व कारणावरून तिचे पती व सासु हे दोघे तिला कायम मारहाण करून शाररीक व मानसिक त्रास देत असल्याचे व तिचे सासरे सुध्दा सासुच्या सांगण्यावरून तिला शिवीगाळ करत असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीची नणंद हि अधुनमधुन यवत येथे घरी येवुन आम्मीला त्रास देते का? असे म्हणुन तिला मारहाण करून पीडितेचा पती इरफान यास हिला सोडुन दे असे सांगायची.


दि. 25/12/2024 रोजी संध्याकाळी 06.30 च्या सुमारास पीडित महिला घरामध्ये एकटी घरातील किचनमध्ये जात असताना तिच्या नणंदेच्या मुलाने किचनकडे जाणाऱ्या वाटेत तिच्यासमोर येवुन अश्लिल चाळे करू लागला. या सर्व प्रकार पाहून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन तिने घाबरून घराबाहेर जाऊन सासुला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी तुला अजुन काही केले नाही ना असे म्हणुन सासु ने तिच्या सोबत वाद करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी तिची नणंद तेथे आल्यानंतर त्यांना सुध्दा तिने घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी तिच्या नणंद ने माझ्यामुलावर घाणेरडे आरोप करते का ? असे म्हणुन तिचे केस धरून हाताने मारहाण केली. यावेळी पीडित महिलेने तिच्या पती ला फोन केला असता त्यानेही घरी येवुन तिला हाताने मारहाण केली. या मारहाणीत या पीडित महिलेच्या डोक्याचे केस उपटण्यात आले असून तिच्या फिर्यादीवरून तिचा पती इरफान युसुफ बेग, सासरे युसुफ रहिम बेग, सासु, नणंद, नंदेचा मुलगा अश्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.