मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून लाथा, बुक्क्यांनी मारहाण.. CCTV फुटेजमुळे मराठी तरुण संतापले

मुंबई : संपूर्ण राज्यातील मराठी माणसांना चीड आणणारी घटना आज कल्याणच्या नांदिवली परिसरात घडली आहे. एका खाजगी दवाखान्यात रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका पर प्रांतीय तरुणाने लाथा, बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठी  माणसांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

मारहाण करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार 22 जुलै रोजी घडला आहे. एका खाजगी दवाखान्यात  रिसेप्शनिस्ट असलेल्या या तरुणीने एका तरुणाला डॉक्टरांकडे पेशंट तपासणीसाठी गेले आहेत, तुमचा नंबर अजून आला नाही, कृपया थोडा वेळ थांबा असे सांगितले. यामुळे संतापलेल्या त्या परप्रांतीय तरुणाने पळत येउन त्या तरुणीला लाथेने मारहाण केली, नंतर तिला बाजूला ढकलून दिले. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी  गौरव झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. या मारहाणीमुळे स्थानिक मराठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयातील CCTV फुटेज पाहिल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठी माणसांमध्ये चीड निर्माण झाली आहे. अगोदरच मुंबईत मराठी अमराठीचा वाद सुरु असताना परप्रांतीय तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे मराठी तरुण पेटून उठले आहेत. आता मनसे या प्रकरणाला कश्या पद्धतीने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.