जालना : काल राज्यसरकारकडून ज्यांना कुणबी वंशावळ असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही त्रुटी काढल्या असून सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो मात्र राज्यसरकार ने सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
वंशावळी दस्ताच्या जाग्यावर सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करत उपोषण सोडण्यात त्यांनी नकार दिला आहे. गेल्या दहा दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषणास बसले असून त्यांचे उपोषण सोडण्यासाठी पोलिसांनी तेथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर मात्र संपूर्ण राज्यामध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा आरक्षण ची मागणी लावून धरली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे.