पुणे

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळखैरे तर दौंड सरचिटणीसपदी पुनम जाधव यांची निवड

पुणे : दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी बारामती तालुक्यातील सुपे येथे  ग्रीन गार्डन मंगल कार्यालयामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळखैरे यांची तर दौंड तालुका सरचिटणीसपदी पुनम जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल  भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील हे यावेळी उपस्यांथित होते. याप्रसंगी आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक माननीय संकेत लोहार यांनी महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच  संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 70 हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेतला असून  बारामती तालुक्यातही अनेक तरुण तरुणींनी  या योजनेचा फायदा घेतला असल्याचे त्यांनी  सांगितले.

सुपे परिसर व येथील वाड्या वस्ती राहणाऱ्या लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हान यावेळी पुणे विभागीय समन्वयक मा. संकेत लोहार, जिल्हा समन्वयक सचिन खोजे यांनी केले. या वेळी उपस्थित असणाऱ्या  नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बारामती तालुका अध्यक्ष पदी प्रकाश काळखैरे यांची तर  दौंड तालुका सरचिटणीस पदी पुनम जाधव यांची निवड अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय अजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय पासलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार (गणेश) शेळके, पुणे शहर सरचिटणीस मयूर गुजर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सौ रेखा कोंडे व सौ. उज्वला ताडगे इत्यादी उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे आयोजन नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काळखैरे मित्रपरिवार,सहकारी यांनी केले. या शिबिरास परिसरातील  ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्पयेने उपस्थित  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार (गणेश) शेळके, सामजिक कार्यकर्ते सतिश ताडगे यांनी केले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago