Categories: राजकीय

केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत घडले अनेक गैरप्रकार ! निवडणूक प्रक्रियेचा खेळखंडोबा, पोलिसांना अरेरावी..

ग्रामपंचायत निवडणूक विशेष

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना मतदान बूथवर अनेक गैरप्रकार घडल्याचे पहायला मिळाले. मतदान करायला आलेल्या गोरगरीब, भोळ्याभाबड्या मतदारांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना आपल्या उमेदवाराला मतदान करा म्हणून दबाव आणणे, पोलिसांना न जूमानने, पोलिसांच्या खुर्च्यांवर बसून यंत्रणा आपल्या खिशात असल्याचे भासवणे असे प्रकार सर्रास घडले असून या मध्ये काही शिक्षक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे दिसून आले. तर एक निवडणूक अधिकारी हे एव्हीएम मशीन च्या पाठीमागे खुर्ची टाकून बसत मतदार कोणाला मतदान करत आहेत असे पाहतानाही दिसून आले.

केडगाव गावठाण येथील मतदान केंद्राच्या खोल्यांमध्ये असलेल्या खिडक्यांमधून काहीजण डोकवून मतदार मतदान कुणाला करत आहेत हे पाहत असल्याचा आरोप काहींनी केला. तर काही कार्यकर्ते सकाळपासून मतदारांच्या रांगेत उभे राहून संध्याकाळपर्यंत फक्त आलेल्या मतदारांमध्ये उमेदवारांचा प्रचार करताना दिसले. काही कार्यकर्ते मतदान केंद्रावर मतदान करायला आल्याचे भासवत पोलिसांच्या खुर्च्यांवर बसून मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून निवडणूक बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी आपल्या खिशात असल्याचे नागरिकांना भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून आले. काहींनी पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली. तर काहीजण मतदान केंद्राच्या आतमध्ये येऊन, कुणाला मतदान करणार आहे असा प्रश्न मतदारांना विचारून या चिन्हासमोरील बटन दाबा, याला मतदान करा, त्याला करू नका असे सांगत असल्याचे मतदारांनी सांगितले.

एक तरुण शिक्षक सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांच्या रांगेत उभे होते मात्र त्या बिचाऱ्यांचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करण्यास नंबर लागला नाही. त्यांना मतदान करण्यास नऊ तास रांगेत का उभे रहावे लागले आणि त्यांचा मतदान करण्यास दिवसभर नंबर का आला नाही याचे उत्तर तेच देऊ शकतील. प्रभाग क्रमांक 6 अ मधील एक निवडणूक अधिकारी हे एव्हीएम मशीन च्या पाठीमागे खुर्ची टाकून बसले होते. मतदार कोणाला मतदान करत आहेत असे पाहताना ते दिसून आल्याने त्यांच्यावर मतदारांनी आक्षेप घेतल्यानंतर मात्र आम्ही मतदान पाहत नाही, कुणाला अडचण आली तर मदत करतो अशी सारवासारव दुसऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. एकंदरीतच केडगाव गावठाण येथील निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पडत असताना सुशिक्षित असतानाही अनेकांनी निवडणूक प्रक्रिया दूषित होईल असे कृत्य केल्याने मतदारांमधून नाराजीचा सुर निघत होता.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

12 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

14 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

15 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

23 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago