दौंड : निवडणूका म्हटले की आरोप प्रत्यारोप, टिका टिप्पणी आलीच. मात्र जर कोणी खालच्या दर्जाची टिका करून खोटेनाटे आरोप केवळ समोरील उमेदवाराला बदनाम करण्यासाठी करत असेल तर मात्र त्याचा उलट परिणाम सुद्धा पहायला मिळतो. असाच प्रकार दौंड तालुक्यात घडताना दिसत आहे.
दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना बदनाम करण्यासाठी काहीजण सोशल मीडियावर सरसावले असून त्यांनी दररोज आ.कुल यांच्याविरोधात काही ना काही खोटे लिहून त्यांची बाजू कशी कमजोर आहे, ते कसे गडबडले आहेत, त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे असा खोटा प्रचार आणि प्रसार सुरु ठेवला आहे. मात्र हे सर्व करूनही आ.राहुल कुल यांच्या लोकप्रियतेत मात्र वाढच होताना दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात केलेला विकास आहे.
या कामांमुळे विरोधकांचा अपप्रचार तोंडघशी – आमदार राहुल कुल यांनी कोरोना महामारीत उत्कृष्ठ काम करून आपले कार्यक्षम नेतृत्व खऱ्या अर्थाने सिद्ध केले. त्यांनी योग्य नियोजनाच्या आधारे तालुक्यात आलेले नदीचे पूर, दुष्काळ परिस्थिती, अत्यावश्यक सेवा, रेल्वे सेवा, बंद झालेला कारखाना पुन्हा सुरु करण्यात आलेले यश आणि कामगारांना पुन्हा एकदा मिळालेला रोजगार, प्रत्येक गावच्या अडीअडचणी, रस्ते, पाणी, वीज यांची सुविधा आणि त्यातून साधलेला गावचा विकास हे प्रामुख्याने लोकांच्या समोर आले आहे. त्यामुळे दौंडचा झालेला विकास आणि मदत अश्या सर्व बाबींमध्ये आ. राहुल कुल हे पुढे जाताना दिसत आहेत आणि या सर्व कामांचा धसका घेऊन मग त्यांना बदनाम करून, खोटे पसरवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्नही सुरु करण्यात आला आहे.
कुल आणि थोरात यांनी समोरासमोर येऊन आपली कामे मांडावीत, या तालुक्यासाठी कुणाचे किती योगदान आहे हे पुन्हा एकदा जनतेच्या समोर येईल असे आवाहन दौंड तालुक्यातील अनेक दिग्गज करताना दिसत आहेत. आता खरंच हे आव्हान स्विकारून समोरासमोर येऊन उत्तरे दिली जातील का हाही यक्षप्रश्नच आहे. कारण भीमा पाटस कारखान्यावर टिका करून त्यावर राजकारण करू पाहणाऱ्या अनेकांना ज्यावेळी सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारले त्यावेळी प्रत्येक प्रश्नाचे योग्य आणि मुद्देसूद उत्तर देऊन राहुल कुल यांनी विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवल्याचे सर्वांनी पाहिले.
कुल यांना बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे व्यथित होऊन तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, विविध पक्ष आणि गटांचे कार्यकर्ते आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करून त्यांची ताकद वाढवू लागले आहेत.